शिव मुद्रा पथक
संस्कृती जपणारा शिव मुद्रा पथका ची सुरुवात झाली. ती 2016 मध्ये 18 ढोल आणि चार तासा सोबत
शिव मुद्रा प्रतिष्ठान चे अध्यक्ष उमेश इंगळे यांनी भुसावळ मध्ये काहीतरी नवीन उपक्रम राबवण्या ची
इच्छा व्यक्त केली.
त्यावर खूप चर्चा झाली आणि मग ढोल पथका चा विचार सुचवण्यात आले. त्यावर सगळ्यांची मते
घेण्यात आली आणि नंतर मी शीतल अग्रवाल आणि मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी जाऊन घरोघरी हा
विचार पोहोचव ला.
मुलामुलीं ना पथका मध्ये येण्या साठी आग्रह केला.
पण मंडळा मध्ये मुलींनी कसा सहभाग घ्याय चा हा खूप मोठा प्रश्न. मुलींनी समोर मांडलं. काही
मुली आला सुद्धा पण पथका मध्ये लागणारी मेहनत बघून त्या आल्या पावली परत गेले.
त्या तल्या काही मुलींनी मात्र जित दाखवून आणि पथका वर विश्वास ठेऊन त्या रोज येऊ लागला.
तेव्हा पुण्या हून 18 ढोल पाच ताशे पथका चा काही सामान मागवण्यात आला आणि सरावास सुरुवात
झाली. काही लोकांचा या उपक्रमा ला आधीपासूनच नकार होता पण तालीम म्हणजे काय आवाज
होणारच आणि हाच नाथ काही लोकांना मात्र गोंगाट वाटू लागला.
परंतु मुला मुली ची जिद्द बघून सर्वांनी पाठिंबा देण्यास सुरवात केली आणि अशा सर्व अडचणींवर
मात करून शिव मुद्रा ढोल पथका चा पहिला ठोका पडला. तो म्हणजे 2016 मध्ये बाप्पा च्या
आगमना ला.
तो ठोका लोकांच्या मनात घर करून गेला. शिस्तबद्ध आणि तालबद्ध असे शिव मुद्रा पथका चे
वादन बघून भुसावळ अँग्री बेधुंद झाली. सगळ्यांनीच कौतुका ची शाबासकी दिली. दुसऱ्या वर्षी पथका
ची कीर्ती पाहता वादकांनी प्रवेशा साठी खूप गर्दी केली. पण आता पथकात प्रश्न होता. वाद्यांचा.
पुरेसा पैसा नव्हता. अशा परिस्थिती मध्ये मदतीसाठी वरून इंगळे यांच्याकडून मदती चा हात
मिळाला. त्यांनी कस लाही विचार न करता पथका ला आर्थिक आधार दिला आणि पथका मध्ये अजून
वाद्यांचा समावेश करण्यात आला आणि शिव मुद्रा पथक वादनास पुन्हा एकदा सज्ज झाले.
आज पथका ची कीर्ती गावोगावी झालेली असून लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेच वादन
बघायला उत्सुक असतात. आज पथका मध्ये जास्त मुलींची संख्या असून 50 ढोल १५ ताशा आहे.
भुसावळ मध्ये नवीन उपक्रम राबवण्या चे स्वप्न पूर्ण झाले असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
आर्थिक मदत करणारे व शिव मुद्रा प्रतिष्ठान चे आधारस्तंभ वरून इंगळे तसेच अध्यक्ष उमेश इंगळे
यांच्या देखरेखी खाली शिव मुद्रा पथक व मंडळाचे कार्य सुरु आहे.
तसेच उपाध्यक्ष राज पवार, खजिनदार प्रदेश चौधरी सोशल मीडिया प्रमुख शुभम पाटील आणि मंडळाचे
कार्यकर्ते जे अगदी पाणीवाटप पासून ते दोन उचले पर्यंत मदत करतात आणि देना नगर मधील
रहिवाशांचे जे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या खंबीर पणे उभे राहिले त्या सर्वांचे मी ऋतुजा इंगळे पथक
प्रमुख म्हणून शिव मुद्रा परिवारा तर्फे आभार मान ते. शिव मुद्रा पथका चा हा प्रवास असाच सुरू राहो
ही बाप्पा चरणी प्रार्थना.